महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शाळेत असताना दीपिका होती मस्तीखोर, शेअर केल्या खास आठवणी - deepika padukon films

दीपिका पादुकोणने तिच्या गुणपत्रिकेचे फोटो शेअर केले आहेत. या गुणपत्रिकांमध्ये तिच्या शिक्षकांनी तिला रिमार्क दिला आहे.

शाळेत असताना दीपिका होती मस्तीखोर, शेअर केल्या खास आठवणी

By

Published : Oct 1, 2019, 11:56 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची चाहत्यांमध्ये एक विशेष क्रेझ पाहिली जाते. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. दीपिका सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या बऱ्याच आठवणी चाहत्यांशी शेअर करत असते. सध्या तिने तिच्या शाळेतील काही आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिच्या शिक्षकांचं तिच्याविषयी काय मत होतं, हे पाहायला मिळतं.

दीपिका पादुकोणने तिच्या गुणपत्रिकेचे फोटो शेअर केले आहेत. या गुणपत्रिकांमध्ये तिच्या शिक्षकांनी तिला रिमार्क दिला आहे. यामध्ये पहिला रिमार्क असा आहे, की 'दीपिका शाळेत खूप बडबड करते'. दुसऱ्या रिमार्कमध्ये लिहिलंय, 'तिने दिलेल्या सुचनांचं पालन करावं' आणि तिसऱ्या रिमार्कमध्ये लिहिलंय, की 'दीपिका दिवसाढवळ्या स्वप्न बघते'.

हेही वाचा -जॉन अब्राहम 'सत्यमेव जयते'च्या सिक्वेलसाठी सज्ज, फर्स्ट पोस्टर प्रदर्शित

तिने शेअर केलेले हे रिमार्क पाहून ती शाळेत किती मस्तीखोर असेल, याचा अंदाज लावता येऊ शकतो.

वक्रफ्रंटबाबत सांगायंच झालं, तर दीपिका मेघना गुलजार यांच्या 'छपाक' चित्रपटात झळकणार आहे. तसंच रणवीर सिंगसोबतही ती '८३' या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -...जेव्हा 'हिट मशिन' अक्षयचे १४ चित्रपट झाले होते फ्लॉप!

ABOUT THE AUTHOR

...view details