मुंबई -दीपिका पदुकोन लवकरच 'छपाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंगसोबत लग्न झाल्यानंतरचा हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. अॅसिड हल्यातून वाचलेल्या आणि इतरांना प्रेरणा देणाऱ्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिका पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका साकाराताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. दरम्यान चित्रपटाच्या एका सीनदरम्यान दीपिका भावूक झाली होती.
अॅसिड हल्यासारखा अत्यंत संवेदनशील विषय 'छपाक' चित्रपटात मांडण्यात येणार आहे. अॅसिड हल्यानंतर पीडित व्यक्तीचे आयुष्य किती कठिण बनते, हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. दिग्दर्शिका मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटाच्या एका सिन दरम्यान दीपिका खूपच भावूक झाली होती. मेकअप करून आल्यानंतर या सिनमुळे ती विचलित झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्यामुळे थोडावेळ शूटिंग थांबवण्यात आली होती.