मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांच्या जोडीचे एक उदाहरण कलाविश्वात निर्माण झालं आहे. नोव्हेंबर महिन्यात दोघांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली. तेव्हापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. मात्र, एका कार्यक्रमात बोलताना आपण रणवीरची पत्नी आहे, हे सांगायलाच दीपिका विसरली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दीपिकानं अलिकडेच मानसिक आरोग्याशी संबधीत सीरिजचं लाँच केलं आहे. लिव्ह, लव्ह, लाफ या फाऊंडेशनअंतर्गत असलेल्या एका कार्यक्रमात दीपिकानं हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दलही संवाद साधला. आपल्या आयुष्यात ती मुलगी, बहिण आणि अभिनेत्री या तीनही भूमिका कशाप्रकारे साकारते, हे तिने यावेळी सांगितले. मात्र, पत्नी असल्याचं सांगायला ती विसरली.