मुंबई -बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा आज ३४ वा वाढदिवस आहे. सध्या ती आगामी 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशन दरम्यान 'छपाक'च्या टीमने तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'छपाक' हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेस्सीची देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. खऱ्या आयुष्यात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरूणींचीही झलक या चित्रपटात पाहता येणार आहे.
मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.