मुंबई- रसिक प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या तसेच प्रत्येक कलाकार आणि दिग्दर्शकाच्या जीवनात महत्त्वाचा असलेल्या ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यात मराठीमधील 'भोंगा' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
'भोंगा' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा तर 'नाळ' फेम श्रीनिवास पोकळे सर्वोत्कृष्ट बालकलाकार - आयुष्मान खुराणा
राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या भोंगा या सिनेमातून वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडत समाजातील वास्तवाची जाणीव करून दिली गेली आहे. यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही हा सिनेमा दाखवला गेला होता
राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या भोंगा या सिनेमातून वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडत समाजातील वास्तवाची जाणीव करून दिली गेली आहे. यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही हा सिनेमा दाखवला गेला होता.
या चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा आणि पटकथा शिवाजी लोटन पाटील यांची आहे. तर सिनेमातील संवाद रमणीरंजन दास यांनी लिहिले आहेत. चित्रपटातील गाणीही उत्तम असून ती सुबोध पवार यांनी लिहिली तर विजय गटलेवार यांनी संगीतबद्ध केली आहेत. तर नाल या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या श्रीनिवास पोकळेला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोबतच या सिनेमाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय हिंदीमध्ये आयुष्मान खुराणा, राधिका आपटे आणि तब्बू यांच्या भूमिका असलेल्या अंधाधून सिनेमाला सर्वोतकृष्ट हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.