महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'चांदणी'च्या एक्झिटला एक वर्ष पूर्ण, बोनी श्रीदेवीच्या 'या' साडीचा करणार लिलाव - Janhavi Kapoor

श्रीदेवी यांच्या कोटा साडीचा लिलाव करण्यात येत आहे. या लिलावातून येणारी रक्कम अनाथ मुले, निराधार महिला आणि वृद्धांसाठी काम करणाऱ्या 'कन्सर्न इंडिया फाऊंडेशन प्रोग्राम' या संस्थेला दिली जाणार आहे.

छायाचित्र सौजन्य - इंस्टाग्राम

By

Published : Feb 24, 2019, 8:36 AM IST

मुंबई- बॉलिवूडची चांदणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज पहिला स्मृतीदिन. गेल्या वर्षी दुबईत हार्ट अटॅकनं त्याचं निधन झालं. श्रीदेवींच्या स्मृतीदिनानिमित्त पती बोनी कपूर त्यांच्या साडीचा ऑनलाईन लिलाव करत आहेत. या साडीचा लिलाव सुरू झाला असून आतापर्यंत तिच्यावर सव्वा लाखा रुपयांची बोली लागली आहे.

श्रीदेवी यांच्या कोटा साडीचा लिलाव करण्यात येत आहे. या लिलावातून येणारी रक्कम अनाथ मुले, निराधार महिला आणि वृद्धांसाठी काम करणाऱ्या कन्सर्न इंडिया फाऊंडेशन प्रोग्राम या संस्थेला दिली जाणार आहे.

श्रीदेवी यांच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि कपूर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. अभिनेत्री श्रीदेवी यांनी नगिना, जुदाई, चांदणी, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, चालबाज, लम्हे असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी आता हयात नसल्या तरी त्यांचा आणि त्यांच्या चित्रपटाचा एक विशिष्ट चाहता वर्ग अजूनही आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details