मुंबई - रणबीर चित्रपटांमुळे जितका चर्चेत राहिला त्यापेक्षाही अधिक आपल्या रिलेशनशिपमुळे राहिला आहे. दीपिका आणि कॅटरिना कैफसारख्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींसोबतचं त्याचं नातं नेहमीच चर्चेचा विषय ठरलं. अशात आता रणबीर आलियाला डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
'इश्क वाला लव्ह', पाहा वरूण आलियाची जबरदस्त केमिस्ट्री
अनेकदा या कपलला एकत्र स्पॉटदेखील केले गेले आहे. इतकंच नाही तर आता आलिया आणि रणबीरने स्टेजवर 'इश्क वाला लव्ह' म्हणत एकमेकांसोबत डान्स केल्याचंही पाहायला मिळालं
अनेकदा या कपलला एकत्र स्पॉटदेखील केले गेले आहे. इतकंच नाही तर आता आलिया आणि रणबीरने स्टेजवर 'इश्क वाला लव्ह' म्हणत एकमेकांसोबत डान्स केल्याचंही पाहायला मिळालं. एका अॅवॉर्ड शोमधील रणबीर आणि आलियाच्या कपल डान्सचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
ही जोडी लवकरच ऑनस्क्रीनही एकत्र झळकणार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात ते स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आलिया आणि रणबीर लग्नगाठ बांधणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या दोघांनी आपल्या नात्याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे, त्यांच्या या कबुलीकडेच आता चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.