महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दबंग ३' की 'गुड न्यूज', वर्षाअखेरीस रंगणार बॉक्स ऑफिसवर चुरस - akshay kumar

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'दबंग ३' २० डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. तर, अक्षय कुमारचा 'गुड न्यूज' हा चित्रपट २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Dabangg3 and GoodNewwz
वर्षाअखेरीस रंगणार बॉक्स ऑफिसवर चुरस

By

Published : Dec 19, 2019, 9:56 PM IST

मुंबई - यंदाचं वर्ष हे बॉलिवूडसाठी फारच लाभदायक ठरलं आहे. बऱ्याच चित्रपटांनी यावर्षी १०० कोटीपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. अक्षय कुमार आणि आयुष्मान खुराना हे यावर्षीदेखील चर्चेत राहिले. इतर कलाकारांच्या तुलनेत या दोन्ही अभिनेत्यांनी यंदाचं बॉक्स ऑफिस गाजवलं. काही चित्रपट अपयशीदेखील ठरले. तर, काही अल्पबजेट चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला. आता वर्षाअखेरीसही दोन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'दबंग ३' २० डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. तर, अक्षय कुमारचा 'गुड न्यूज' हा चित्रपट २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकापाठोपाठ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देताना दिसतील.

हेही वाचा -प्रदर्शनापूर्वी चुलबुल पांडे आणि खुषीची रोमॅन्टिक झलक, पाहा 'दबंग ३' चं 'आवारा' गाणं

'दबंग ३' च्या ट्रेलरसोबतच चित्रपटातील गाणीदेखील हिट झाली आहेत. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा आणि किच्चा सूदीप यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.

तर, दुसरीकडे अक्षय कुमार, करिना कपूर, कियारा आडवाणी आणि दलजीत दोसांझ यांची मुख्य भूमिका असलेल्या गुड न्यूज विषयीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

हेही वाचा -चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'दंबग ३'ची टीम हैदराबादमध्ये दाखल

अक्षय कुमारचे यावर्षी 'केसरी', 'मिशन मंगल' आणि 'हाऊसफूल ४' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता वर्षाअखेरीच आपल्या 'गुड न्यूज' सोबत तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. त्यामुळे आता 'दबंग ३' आणि 'गुड न्यूज' बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतात हे पाहणं रंजक ठरेल.

ABOUT THE AUTHOR

...view details