मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या 'दबंग ३' चित्रपटातून प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट बराच चर्चेत राहिला. ट्रेलरवरही चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या चित्रपटातील गाणीदेखील सोशल मीडियावर हिट झाली आहेत. हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे दाक्षिणात्य राज्यांमध्ये चित्रपटांचे प्रमोशन करण्यात येत आहे.
अलिकडेच या चित्रपटाच्या टीमने हैदराबाद येथे हजेरी लावली. यावेळी सलमान खानसोबत सहकलाकार सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप आणि दिग्दर्शक प्रभू देवा उपस्थित होते.
त्यांच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेते दग्गुबती वेंकटेश आणि रामचरण यांचीही खास उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी सलमानसोबत चित्रपटातील गाण्यांवर डान्सही केला.