मुंबई - 'दबंग-३' चित्रपटातून 'चुलबुल पांडे' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाची चर्चा आहे. सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली आहे.
भाईजानच्या 'दबंग-३' चा मुहूर्त ठरला, 'या' दिवशी होणार प्रदर्शित - prabhudeva
दबंगच्या दोन्ही भागांना मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.
या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच ख्रिसमस आठवड्यामध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दबंगच्या दोन्ही भागांना मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरणही पूर्ण झाले आहे. डिसेंबर महिन्यात २० तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
प्रभूदेवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. विशेष म्हणजे वॉन्टेडनंतर तब्बल १० वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एकत्र झळकणार आहे. दरम्यान चुलबूल पांडे पुन्हा एकदा चाहत्यांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.