मुंबई -दबंग आणि दबंग २ या सिनेमांना मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच दबंग ३ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट बराच चर्चेत राहिला. ट्रेलरवरही चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यामुळे पहिल्या दिवशी या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता होती.
पहिल्याच दिवशी भाईजानच्या चाहत्यांचा चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला आहे. दुहेरी अकांची कमाई करून पहिल्याच दिवशी 'दबंग ३' २४.५० कोटीची कमाई केली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही आकडेवारी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हेही वाचा -Public Review: 'दबंग ३' पाहायला जाताय, जाणून घ्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
सलमानच्या 'दबंग' चित्रपटाने २०१० साली पहिल्या दिवशी १४.५० कोटीची कमाई केली होती. तर, २०१२ साली 'दबंग २' चित्रपटाची कमाई ही २१.१० कोटी होती. या दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत 'दबंग ३'ची कमाई जास्त आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पहिल्या आठवड्यात हा चित्रपट ५० कोटीपेक्षा जास्त कमाई करेल, असा अंदाज समीक्षकांनी व्यक्त केला आहे.