गोंदिया - दाह, एक मर्मस्पर्शी कथा हा सामाजिक विषयावरील चित्रपट आज महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. गोंदिया जिल्ह्यातील अनेक निसर्गस्थळांवर चित्रण झाले असून अनेक स्थानिक कलाकारांना या सिनेमातून वाव मिळाला आहे. आज गोंदियात या चित्रपटाचा नायक सुह्रद वर्देकर थिएटरमध्ये उपस्थित होता.
जिल्ह्यात बनलेला 'दाह' पाहण्यासाठी गोंदियाकरांची गर्दी
गोंदिया जिल्ह्याचे चित्रण असलेला सामाजिक चित्रपट दाह आज प्रदर्शित झाला. दाह, एक मर्मस्पर्शी कथा असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. अनिकेत बडोले यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
'दाह' पाहण्यासाठी गोंदियाकरांची गर्दी
सिनेमा संपल्यानंतर अनेकांनी सुह्रदसोबत सेल्फी फोटो काढले. हा चित्रपट आवडल्याचा भाव सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मल्हार गणेश यांनी याचे दिग्दर्शन केले असून अनेक दिग्गज मराठी कलाकारांचा समावेश यात आहे. अभिनेत्री सायली संजीव, डॉ. गिरीश ओक, राधिका विद्यासागर, सुह्रद वर्देकर, यतीन कर्येकर, उमा देशमुख यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
Last Updated : Feb 15, 2020, 6:05 PM IST