महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

९३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कार सोहळा ४ महिने लांबणीवर - Oscars to get delayed by four months

जगभरातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुढच्या वर्षी होणारा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा चार महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ९३ वर्षांच्या काळात हा सोहळा पहिल्यांदाच पुढे ढकलण्यात आलाय. २८ फेब्रुवारीला होणारा हा सोहळा कदाचित मे किंवा जून महिन्यात होऊ शकेल.

COVID-19 effect
ऑस्कर पुरस्कार सोहळा ४ महिने लांबणीवर

By

Published : May 12, 2020, 5:00 PM IST

लॉस एंजेलिस - कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाने संपूर्ण जगाला वेढले आहे. त्यामुळे अनेक नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येतात किंवा रद्द केले जातात. याचाच फटका ऑस्कर पुरस्कारालाही बसला आहे. पुढच्या वर्षी होणारा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा चार महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ९३ वर्षांच्या काळात हा सोहळा पहिल्यांदाच पुढे ढकलण्यात आलाय.

द सनने दिलेल्या बातमीनुसार २८ फेब्रुवारी २०२१ला पार पडणारा हा ऑस्कर सोहळा पुढे ढकलण्यासाठी आयोजक चर्चेसाठी एकत्र आले आहेत. हा सोहळा कदाचित मे किंवा जून महिन्यात होऊ शकेल.

अनेक हॉलिवूड स्टुडिओंना याची पूर्वकल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे नामांकने दाखल करण्यासाठी त्यापद्धतीने ते नियोजन करू शकतात. ऑस्कर पुरस्काराची सीझन उन्हाळ्यानंतर सुरू होता. यात सहभागी होणारे स्टुडिओ नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याचे स्पर्धक जाहीर करतात. जानेवारी महिन्यात अकादमीचे सदस्य यासाठी मतदान करतात.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरात सुरू असलेल्या शटडाऊन दरम्यान, चित्रपटगृहे बंद राहिल्याने अनेक चित्रपटांची रिलीज पुढे गेली आहेत. अनेक बिग बजेट चित्रपटांसह जेम्स बाँडचा नो टाइम टू डाई, टॉप गन: मॅव्हरिक, मुलान आणि मार्व्हलची ब्लॅक विडो या चित्रपटांचा समावेश आहे.

“सध्या सुरू असलेल्या कोरोनाव्हायरस संकटामुळे या सिने उद्योगात लाट निर्माण झाली आहे आणि यंदाच्या अनेक सिनेमांच्या रिलीजच्या योजना विस्कटल्या आहेत. रिलीऑस्कर सोहळा पुढे ढकलण्यासाठी आयोजक चर्चा करीत आहेत,'' असे सूत्राने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details