महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरोनाच्या भितीने 'आयसोलेशन'मध्ये गेले दिलीप कुमार, सायरा घेताहेत काळजी - Dilip kumar in isolation

दिग्गज अभिनेता दिलीप कुमार कोरोनाच्या धास्तीने आयसोलेशनमध्ये गेले आहेत. त्यांच्या पत्नी सायरा बानो काळजी घेत असल्याचे ट्विट दिलीप कुमार यांनी काल रात्री केले आहे.

Dilip kumar
दिलीप कुमार

By

Published : Mar 17, 2020, 12:12 PM IST

मुंबई - संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने दहशत पसरवली आहे. यापासून वाचण्याचा प्रयत्न लोक आपल्यापरीने करीत आहेत. असे असले तरी व्हायरसच्या तडाख्यात अडकलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुर्भाव लक्षात घेत दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांनी स्वतः आयसोलेशनमध्ये भरती होण्याचा निर्णय घेतलाय. प्रकृती साथ देत नसल्यामुळे दिलीप कुमार नियमित उपचार घेत असतात. काल रात्री त्यांनी ट्विरवर ही माहिती दिलीय.

दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो त्यांची काळजी घेत आहेत. कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे.

शक्य तितक्या प्रकारे स्वतःची काळजी घ्या, असा संदेशही दिलीप कुमार यांची चाहत्यांना दिलाय.

त्यांनी लिहिलंय, ''कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करा. दुसऱ्यांसाठी स्वतःची जोखीम मर्यादित करुन दुसऱ्यांचे रक्षण करा.''

गेल्या आठवड्यात पाठदुखीच्या त्रासासाठी दिलीप कुमार रुग्णालयात चेकअपसाठी गेले होते.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार देशभरात सोमवारी कोरोना व्हायरसची लागण झालेले ११४ संशयित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात ही संख्या ३८ पर्यंत पोहोचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details