मुंबई -छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत 'राणा दा'च्या वडिलांची भूमिका साकारणारे मिलिंद दास्ताने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएनजी ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी दास्ताने दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'राणादा'चे ऑनस्क्रिन वडील मिलिंद दास्ताने यांच्याविरोधात पीएनजी ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - froud
मिलिंद दास्ताने आणि त्यांची पत्नी सायली दास्ताने यांनी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या औंध येथील दुकानातून २५ लाख रुपयांच्या दागिन्यांची उधारीवर खरेदी केली होती. मात्र, या खरेदी केलेल्या दागिन्यांचे त्यांनी वर्षभरानंतरही पैसे दिले नाहीत.
पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी. एन. गाडगीळचे संचालक अक्षय गाडगीळ यांनी या प्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मिलिंद दास्ताने आणि त्यांची पत्नी सायली दास्ताने यांनी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सच्या औंध येथील दुकानातून २५ लाख रुपयांच्या दागिन्यांची उधारीवर खरेदी केली होती. मात्र, या खरेदी केलेल्या दागिन्यांचे त्यांनी वर्षभरानंतरही पैसे दिले नाहीत.
आपली एक मालमत्ता विक्री करायची असून त्यातून ३ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ही रक्कम दागिन्यात गुंतवायची असल्याचे मिलिंद दास्ताने आणि त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यांनी २५.६९ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले. मात्र, रक्कम एकत्रित देण्याऐवजी हप्त्यांवर देणार असल्याचे सांगितले आणि पैसे दिले नाही. त्यामुळे पी एन जी ज्वेलर्सने पोलिसात धाव घेतली.