मुंबई - पंचतारांकित हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती या गगनाला भिडणाऱ्या असतात. अगदी चहा कॉफीचेही अव्वाच्या सव्वा रुपये ग्राहकांकडून आकारले जातात. मात्र, कॉमेडियन असलेल्या किकू शारदाचे बिल पाहून सर्वसामान्यच काय पण सेलिब्रिटी देखील थक्क होतील.
किकू शारदाच्या चहा कॉफीचं बिल पाहून तुम्हीही व्हाल थक्क, शेअर केली पोस्ट - इंडोनेशिया
किकूने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर त्याच्याकडुन आकारण्यात आलेले चहा कॉफीचे बिल पोस्ट केले आहे. सध्या तो इंडोनेशियातील बाली येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
किकूने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर त्याच्याकडुन आकारण्यात आलेले चहा कॉफीचे बिल पोस्ट केले आहे. सध्या तो इंडोनेशियातील बाली येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिथल्याच एका हॉटेलमध्ये त्याने एक कप चहा आणि कॅपुचिनो ही कॉफी मागवली. त्यासाठी त्याला तब्बल ७८ हजार ६५० इतके बिल आले आहे.
या बिलाचा फोटो शेअर करुन किकूने लिहिलेय, की 'माझ्या एका कॉफी आणि चहाचे बिल ७८६५० इतके झाले. मात्र, मी कोणतीही तक्रार करणार नाही. कारण, मी बाली येथे आहे. भारतीय चलनात याची किंमत ४०० इतकी आहे'.
किकूच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी देखील त्याला प्रतिक्रिया दिल्या आहेत.