शूटिंग दरम्यान कलाकार आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई - मुख्यमंत्री - mahi gill
कलाकारांचे आणि कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. तसेच, कलाकारांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले असल्याची माही गिल यांनी पत्रकारांना सांगितले.
शूटिंग दरम्यान कलाकार आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल - मुख्यमंत्री
मुंबई- मीरा रोड येथे 'फिक्सर' या शोच्या शूटिंग वेळी अज्ञात हल्लेखोरांनी अभिनेत्री माही गिल आणि इतर कलाकारांना मारहाण केली होती. दरम्यान याप्रकरणी 'फिक्सर'च्या कलाकारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.