हैदराबाद - टीव्ही आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रनने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो आता व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्वत: सोबत घडलेल्या एका घटनेबद्दल सांगत आहे. यासोबतच अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवाहन केले आहे. आता या संपूर्ण प्रकरणात सीआयएसएफने अभिनेत्रीची गैरसोय झाल्याबद्दल माफी मागितली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे समजून घेण्यासाठी वाचा..
सीआयएसएफने पाठवला माफीनामा
अभिनेत्रीची माफी मागताना सीआयएसएफने म्हटले आहे की, "संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी सुधा चंद्रन यांना कृत्रिम अवयव काढून टाकण्याची विनंती का केली आणि यापुढे प्रवाशांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करून घेणार आहोत."
सुधा चंद्रन यांनी पंतप्रधानांना केले होते आवाहन
अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये सांगितले होते की, विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी कसून चौकशी केल्यानंतरच प्रवाशाला आत जाऊ देतात. हवाई प्रवासादरम्यान सुधाला प्रत्येक वेळी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अभिनेत्रीसाठी ही दुविधा आहे कारण अभिनेत्रीला पाय नाही आणि तिने कृत्रिम पाय घातले आहेत.
विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला ते उतरवण्यास सांगितले, जे अभिनेत्रीसाठी खूप वेदनादायक आहे. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीने पीएम मोदींना आवाहन केले की ज्येष्ठ नागरिकांसाठी चेक इन आणि चेकआउटसाठी कार्ड जारी करा, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
विमानतळावर काय घडले होते?
सुधा चंद्रन म्हणाल्या की, 'मी इथे जे सांगणार आहे ती एक अतिशय वैयक्तिक नोट आहे. मला हे पीएम मोदीजींना सांगायचे आहे, माझे हे आवाहन राज्य आणि केंद्र सरकार दोन्हींसाठी आहे. जेव्हाही मी विमानाने प्रवास करते, तेव्हा मला विमानतळावर थांबवले जाते. याबद्दल जेव्हा मी सीआयएसएफ अधिकाऱ्यांशी बोलले तेव्हा ते म्हणाले, की माझ्या कृत्रिम अवयवासाठी ईटीडी करा. तरीही मी माझे कृत्रिम अवयव काढून त्यांना दाखवावे अशी त्यांची इच्छा असते.'
मोदीजी हे मानवतेसाठी शक्य आहे का? आपला देश असा आहे का? असा आदर दुसऱ्या स्त्रीला दिला जातो का? चंद्रन पुढे म्हणाल्या की, 'मोदीजींना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना एक कार्ड द्यावे, ज्यात लिहिलेले असावे की ते ज्येष्ठ नागरिक आहेत', त्यांना प्रत्येक वेळी विमानतळाच्या सुरक्षिततेतून जाणे आवडत नाही आणि त्यांनी केंद्र सरकारला याबाबत त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
सुधा चंद्रन यांनी अपघातात गमावला होता पाय
विशेष म्हणजे, एका रस्ता अपघातादरम्यान, सुधा चंद्रन गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा एक पाय उपचारासाठी तोडावा लागला. इतक्या वेदनांशी झुंज देऊनही सुधा चंद्रन यांनी त्यांचे धैर्य आणि विश्वास डगमगू दिला नाही. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्या एक प्रशिक्षीत डान्सर आहेत आणि उत्तम अभिनेत्रीही आहेत. 'नाचे मयूरी' हा चित्रपट त्यांच्या या कलेला समर्पित आहे.