मुंबई - बॉलिवूडचा 'दबंग' स्टार सलमान खान 'दबंग ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याने 'दबंग' मध्ये साकारलेली 'चुलबूल पांडे'ची भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली होती. 'दबंग ३'मध्येही त्याची हिच दमदार झलक पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये 'चुलबूल पांडे'ची खास ओळख करुन देण्यात आली आहे.
'दबंग ३'च्या सेटवरुन आत्तापर्यंत बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमान खाननेही या चित्रपटाचे अपडेट्स वेळोवेळी चाहत्यांशी शेअर केले आहेत. 'स्वागत नही करोगे हमारा', असे कॅप्शन देत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. नेहमीप्रमाणेच सलमानच्या खास अंदाजात 'चुलबूल पांडे'ची ही झलक या व्हिडिओत पाहायला मिळते.
हेही वाचा- शाळेत असताना दीपिका होती मस्तीखोर, शेअर केल्या खास आठवणी