मुंबई - 'दंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'छिछोरे' चित्रपटाचीही १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे. १३ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १०२ कोटींची मजल मारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी आयुष्मान खुरानाचा 'ड्रीमगर्ल' चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. तरीही 'छिछोरे' चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत.
'छिछोरे' चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने अवघ्या ७.३२ कोटींची कमाई केली होती. मात्र, प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे हा चित्रपट १०० कोटींची कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे.
हेही वाचा-छिछोरेचा नवा व्हिडिओ तुम्हाला करुन देईल कॉलेजमधील दिवसांची आठवण