महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'छपाक'मधील अव्यक्त प्रेमाची झलक, पहिलं गाणं प्रदर्शित - deepika padukon in chapaak

अभिनेता विक्रांत मेस्सीने या चित्रपटात दीपिकासोबत भूमिका साकारली आहे. 'नोक झोक' या गाण्यात दोघांचीही रोमॅन्टिक झलक पाहायला मिळते.

Chhapaak first song Nok Jhok release, underlines unspoken love
'छपाक'मधील अव्यक्त प्रेमाची झलक, पहिलं गाणं प्रदर्शित

By

Published : Dec 19, 2019, 11:05 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुचर्चित असलेल्या 'छपाक' चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. अ‌ॅसिड हल्ल्यातून बचावलेली पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. दीपिका पदुकोण यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. ट्रेलरनंतर या चित्रपटातील पहिलं गाणं देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यातून अव्यक्त प्रेमाची झलक उलगडली आहे.

अभिनेता विक्रांत मेस्सीने या चित्रपटात दीपिकासोबत भूमिका साकारली आहे. 'नोक झोक' या गाण्यात दोघांचीही रोमॅन्टिक झलक पाहायला मिळते.

दीपिकाने या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'बिगडी हुई बात को बनाता है और रूठे हुये प्यार को मनाता है प्यार', असे कॅप्शन तिने या व्हिडिओवर दिले आहे.

हेही वाचा -'दबंग ३' की 'गुड न्यूज', वर्षाअखेरीस रंगणार बॉक्स ऑफिसवर चुरस

सिद्धार्थ महादेवनने हे गाणं गायलं आहे. तर, शंकर-एहसान-लॉय यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर, गुलजार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'राजी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता 'छपाक' मधून लक्ष्मी अग्रवालची कथा पडद्यावर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -भाईजानला मागे टाकत विराट कोहली बनला सर्वाधिक लोकप्रिय, फोर्ब्सच्या यादीत पटकावले पहिले स्थान

ABOUT THE AUTHOR

...view details