महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भारतीय सिनेमाची चर्चा सत्यजीत रे यांच्यापासून सुरू होते - अनुराग कश्यप - ५ व्या दमदम आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हला सुरूवात

कोलकाता येथे सुरू असलेल्या ५ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये अनुराग कश्यप सहभागी झाला होता. भारतीय सिनेमाची चर्चा ही सत्यजीत रेंच्यापासून सुरू होते असे तो यावेळी म्हणाला.

Anurag Kashyap
अनुराग कश्यप

By

Published : Feb 4, 2020, 7:28 PM IST


कोलकाता - ५ व्या डमडम आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हला सुरूवात झालीय. याचा प्रमुख पाहुणा म्हणून बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हजर होता. भारतीय सिनेमाची चर्चा ही सत्यजीत रे यांच्या नावापासून सुरू होत असल्याचे त्याने सांगितले.

अनुराग म्हणाला, ''आम्ही जगभर प्रवास करतो, जेव्हा भारतीय सिनेमाचा विषय निघतो तेव्हा त्याची सुरूवात सत्यजीत रे यांच्यापासून होते. इतकेच नाही तर हिंदी भाषेतील महान दिग्दर्शक बिमल रॉय आणि गुरू दत्तदेखील इथलेच होते आणि इथूनच त्यांनी सुरूवात केली होती.''

कोलकाताबद्दल बोलताना अनुराग म्हणाला, ''मला इथले जेवण आवडते, मला इथल्या जागा आवडतात आणि माझे भरपूर मित्र इथे राहतात.''

कामचा विचार करता अनुराग कश्यप सध्या नेटफ्लिक्ससाठी 'चोक्ड' ही मालिका करीत आहेत. ही एका बँक कॅशियरची गोष्ट आहे. त्याच्या स्वैपाक घरात धनाचा स्त्रोत मिळतो आणि त्याचे जीवन बदलते, असा विषय यात पाहायला मिळणार आहे. यात सयामी खेर आणि रोशन मॅथ्यू यांच्या भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details