मुंबई -अभिनेता कुणाल खेमू, रसिका दुग्गल, रणवीर शौरी, आणि विजय राज यांची मुख्य भूमिका असलेला 'लूटकेस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुणाल खेमूने अलिकडेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. आता या चित्रपटातील सर्व कलाकारांची झलक समोर आली आहे. तसंच या चित्रपटाच्या ट्रेलरचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
१९ सप्टेंबरला 'लूटकेस'चा ट्रेलर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात या कलाकारांची नेमकी भूमिका काय असणार, हे सांगणारे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.