आतापर्यंत अनेक युध्दपट हॉलिवूडमध्ये निर्माण झाले. परंतु यासर्वाहून अधिक भव्य असा ऐतिहासिक नाट्य असलेला चित्रपट येतोय. 'मिडवे' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. अमेरिकन नौदलाने जपानी नौदलावर केलेल्या ऐतिहासिक आक्रमणाचा थरार 'मिडवे'मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रियंका चोप्राचा पती निक जोनास याची या सिनेमात महत्त्वाची भूमिका आहे. त्याचा लूक असलेले एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
'मिडवे' : दुसऱ्या महायुध्दाच्या ऐतिहासिक युध्दपटात झळकलाय प्रियंकाचा पती निक जोनास - प्रियंकाचा पती निक जोनास
प्रियंका चोप्राचा पती निक जोनास मिडवे या युध्दपटात काम करीत आहे. त्याची व्यक्तीरेखा असलेले पोस्टर रिलीज झाले आहे.
या चित्रपटात हॉलिवूडच्या अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. यातील प्रत्येक कलाकाराला आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळत आहेत. दुसऱ्या महायुध्दात पॅसिफीक समुद्रात जपानी नौदल आणि अमेरिकन नौदलात लढल्या गेलेल्या घनघोर युध्दाची कथा यात मांडणात आली आहे.
प्रियंका चोप्राचा पती निक जोनासची या सिनेमातील व्यक्तीरेखा दाखवणारे पोस्टर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केलं आहे. 'मिडवे' हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीसाठी भारतात दाखल होत आहे.