मुंबई -अवघ्या जगाचे लक्ष लागलेली भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मोहिमेच्या अंतिम टप्प्यात चंद्राच्या २.१ किलोमीटर जवळ गेल्यानंतर विक्रम लँडरचा संपर्क तुटला. यामुळे सर्व शास्त्रज्ञांचा आणि देशाचा हिरमोड झाला. मात्र, अजूनही विक्रम लँडरशी संपर्क होण्याची आशा जिवंत आहे. 'चांद्रयान २' चंद्रावर उतरताना पाहण्याचा एतिहासिक क्षण साठवून ठेवण्यासाठी बॉलिवूड कलाकारही उत्सुक होते. मात्र, ऐनवेळी संपर्क तुटल्याने त्यांचीही निराशा झाली. तरीही इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांप्रती आदर व्यक्त करुन बॉलिवूडकरांनी दिलासा दिला आहे.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखपासून ते अनुपम खेर यांच्यापर्यंत बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शास्त्रज्ञांप्रती आदर व्यक्त करत ट्विट केले आहे.
'ज्यांचा आपल्या स्वप्नांवर विश्वास आहे, त्यांची स्वप्न नक्कीच पूर्ण होतात', असे ट्विट रितेश देशमुखने केले आहे. आम्हाला सर्व टीमवर गर्व आहे. आज जे काही मिळवलं तेही एक यशंच असल्याचंही त्यानं म्हटलं आहे.
हेही वाचा-इस्रो ही कधीही हार न मानणारी संस्था, चांद्रयानाचा प्रवास दमदार - पंतप्रधान