लॉस एंजेलिस - 'ब्लॅक पँथर'मध्ये अतुलनीय कामगिरी करणारे अमेरिकन अभिनेता चॅडविक बोसमन याचे आतड्याच्या कर्करोगाने निधन झाले. चॅडविक हा गेल्या चार वर्षांपासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी लढा देत होता आणि अखेर त्याची ही लढाई अपयशी ठरली. लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की २०१६ मध्ये त्याला या आजाराचे निदान झाले होते. शेवटच्या क्षणी त्याची पत्नी आणि कुटुंब एकत्र होते.