वॉशिंग्टन :मार्वलच्या अनेक सिनेमांमध्ये ब्लॅक पँथर या सुपरहीरोची भूमीका साकारणारा अभिनेता चॅडविक बोसमन याचे 28 ऑगस्टला निधन झाले होते. त्याच्यावर तीन सप्टेंबरला साऊथ कॅरोलिनाच्या बेल्टनमधील एका चर्चमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर चर्चच्या दफनभूमीमध्ये त्याला दफन करण्यात आले. सोमवारी याबाबत माहिती जाहीर करण्यात आली.
चॅडविक हा गेल्या चार वर्षांपासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी लढा देत होता आणि अखेर त्याची ही लढाई अपयशी ठरली. 28 ऑगस्टला लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.