मुंबई - सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन (सीबीएफसी) आता नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. कारण, सीबीएफसीला आता नवा लोगो आणि प्रमाणपत्राची डिझाईन लॉन्च करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरांच्या हस्ते हा लोगो लॉन्च करण्यात आला.
सेंसर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी यांनी याबाबत सांगितले, की सीबीएफसीचा नवा लोगो हा नव्या पीढीचा विचार करुन तयार करण्यात आला आहे. आजच्या डिजीटल विश्वासाठी हा लोगो एकदम योग्य पद्धतीने तयार करण्यात आलाय. हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.