मुबंई -आपल्या स्टाईलमुळे नेहमी वादग्रस्त वागणुकीमुळे चर्चेत आलेला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धक अभिजीत बिचुकलेला खंडणी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच्याविरोधातील तक्रार मागे घेतल्यामुळे त्याचा बिग बॉसचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तो अटक झाल्यानंतर आता त्याला पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये प्रवेश मिळेल का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
मुळचा साताऱ्याचा असलेल्या बिचुकलेला आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली आहे. बिग बॉसमधील त्याची स्टाईल आणि इतर स्पर्धकांबद्दल केलेल्या शिवीगाळ प्रकरणी तो चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वीच त्याला चेक बाऊन्सप्रकरणी बिग बॉसच्या घरातून आरे पोलिसांनी अटक केले होते. मात्र, या प्रकरणात त्याला जामीन मिळाला होता. पण, २०१२ साली खंडणी प्रकरणातील त्याचा जामीन फेटाळण्यात आला होता. आता त्याच्याविरोधातील तक्रार फिर्यादीनेच मागे घेतल्याने त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.