महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कार्डी बीने 'फास्ट एंड फ्यूरियस 9'मधील आपल्या भूमिकेबद्दल केला खुलासा - कार्डी बीने भूमिकेबद्दल केला खुलासा

अमेरिकन रॅपर कार्डी बीने "फास्ट अँड फ्यूरियस" फ्रेंचायझी चित्रपटाच्या नवव्या भागात दिसणार असल्याचा खुलासा केलाय. यातील तिच्या भूमिकेबद्दल आणि विन डिजेलबद्दलही भाष्य केलंय.

Cardi B
कार्डी बी

By

Published : Jun 17, 2021, 9:01 PM IST

मुंबई - अमेरिकन रॅपर कार्डी बीने अधिकृतपणे खुलासा केला आहे की ती "फास्ट अँड फ्यूरियस" फ्रेंचायझी चित्रपटाच्या नवव्या भागात दिसणार आहे. रॅपरने आपल्या लेयसा या व्यक्तीरेखेबद्दल आणि ती या चित्रपटाची एक भाग कशी बनली याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाले की फ्रेंचायझीचा नायक विन डिजेल याने तिला चित्रपटात सहभागी करुन घेण्यात मोलाची भूमिका बजावत आहे.

कार्डी बीने चित्रपटातील एका सीनच्या मागील व्हिडिओमध्ये आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हटले की विन डिजेल पोहोचला आणि या भूमिकेबद्दल बोलत होता. मला 'इट्स फ्रेकीन' आणि 'फास्ट अँड फ्यूरियस' आवडत होते आणि मला ही भूमिकाही आवडली. मी अशा सामर्थ्यवान, मजबूत स्त्रीचे प्रतिनिधित्व करीत आहे याचा मला खूप आनंद झाला.

विन डिजेलबरोबर फ्रँचायझीमध्ये काम करण्याबद्दलही तिने भाष्य केले. कार्डी म्हणाली की विन खूपच छान आहे आणि मस्त आहे. तो आपल्याला खूप कंफर्टेबल करतो. मी खूप उत्साहित झाले आहे.

हेही वाचा - मर्सिडीस - मेबॅक GLS600 (किंमत ३ कोटी) : मुलगा इशांतला सोनू सूदची प्री-फादर्स डे भेट

ABOUT THE AUTHOR

...view details