मुंबई -बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी आणि इंटेरिअर डिझायनर गौरी खानने अलीकडेच आपल्या स्टूडिओमध्ये एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन एंटरटेनमेंटच्या शोसाठी आयोजित करण्यात आली होता. या पार्टीत बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.
यावेळी शाहरुख खानने ट्रेडमार्क काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर, गौरी लाल रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. दोघांचीही खास केमेस्ट्री दिसून येत होती. या जोडीचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा -परीक्षेच्या अगोदर अक्षयने लेकीला दिल्या कराटे टिप्स