लॉस एंजेलिस - बुलेट्स ओव्हर ब्रॉडवे चित्रपटातील कामगिरीबद्दल टोनी पुरस्कारासाठी नामांकित झालेला अभिनेता निक कॉर्डोरो याचा कोरोनाव्हायरसशी झालेल्या युद्धानंतर मृत्यू झाला आहे. त्याची पत्नी आणि फिटनेस प्रशिक्षक अमांडा क्लोट्स यांनी ही माहिती दिली. तो 41 वर्षांचा होता.
सुरुवातीला न्यूमोनियाच्या उपचारांसाठी सिडर्स-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये अतिदक्षता विभागात निक कॉर्डोरो याला ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोरोनासह अनेक आजारांची गुंतागुंत वाढली होती. यात त्याचा उजवा पाय कापण्यात आला होता. त्याचे फुफ्फुस प्रत्योरोपण करण्यात येणार होते.
निक कॉर्डोरोची पत्नी अमांडा क्लोट्स यांनी त्याच्या मृत्यूची बातमी इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.
“आता स्वर्गात देवाचा आणखी एक देवदूत आहे. माझ्या प्रिय नवऱ्याचे आज सकाळी निधन झाले. तो त्याच्या कुटूंबाच्या प्रेमात घेरला होता, गाणे गाऊन प्रार्थना करत असताना त्याने हळूच ही पृथ्वी सोडली,” असे अमांडा क्लोट्स यांनी म्हटले आहे.