महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिनेमागृहात 'छिछोरें'ची एन्ट्री, जाणून घ्या पहिल्या दिवशीचा गल्ला - तुषार पांडे

सुशांतच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत 'एम.एस.धोनी - द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. तर, मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'केदारनाथ' चित्रपटापेक्षा 'छिछोरे'ची कमाई जास्त आहे.

सिनेमागृहात 'छिछोरें'ची एन्ट्री, जाणून घ्या पहिल्या दिवशीचा गल्ला

By

Published : Sep 7, 2019, 12:57 PM IST

मुंबई -अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांचा मल्टीस्टारर असलेला 'छिछोरे' चित्रपट सिनेमागृहात झळकला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कॉलेजवयीन धम्माल आणि मैत्री पुन्हा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ट्रेलरपासूनच या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

'छिछोरे' चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.३२ कोटींचा गल्ला जमवला आहे. अवघ्या १२००-१३०० स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकला आहे. त्यामुळे चित्रपटाचे आकडे पाहता पहिल्या दिवशीचा हा गल्ला समाधानकारक मानला जात आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या आकड्यांबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. शिवाय विकेंडला या चित्रपटाला आणखी चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. या चित्रपटाला साडेतीन स्टार्स देत त्यांनी चित्रपटाची स्तुती केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. त्यांनी 'दंगल' चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे 'छिछोरे' चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत.

सुशांतच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत 'एम.एस.धोनी - द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. तर, मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'केदारनाथ' चित्रपटापेक्षा 'छिछोरे'ची कमाई जास्त आहे.

सुशांत सिंह राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, तुषार पांडे, नवीन पॉलिशेट्टी, ताहिर भसीन, प्रतीक बब्बर आणि इतर कलाकारांची तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट आता आणखी किती कमाई करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details