महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मिशन मंगल' vs 'बाटला हाऊस', दोन्ही चित्रपटांना दुसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद - जॉन अब्राहम

'बाटला हाऊस एन्काऊंटर'चा थरार उलगडण्यात जॉनची टीम यशस्वी ठरली आहे. तर, 'मिशन मंगल'देखील प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरत आहे.

'मिशन मंगल' vs 'बाटला हाऊस'

By

Published : Aug 17, 2019, 10:25 AM IST

मुंबई -मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम दोघांचेही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. तरीही दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी 'मिशन मंगल'ने बाटला हाऊसच्या तुलनेत जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट अक्षयच्या करिअरमधला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. तर, जॉनच्या 'बाटला हाऊस'नेही १५ कोटीची कमाई करत दमदार ओपनिंग केली आहे. आता दुसऱ्या दिवशीचे आकडेदेखील समोर आले आहेत.

जॉनच्या 'बाटला हाऊस'च्या कमाईमध्ये दुसऱ्या दिवशी ७ ते ८ कोटीची भर पडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत या चित्रपटाची कमाई २५ कोटी इतकी झाली आहे. तर, 'मिशन मंगल'च्या कमाईतही १६ ते १७ कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाने ४५ कोटींचा पल्ला गाठला आहे.

'बाटला हाऊस एन्काऊंटर'चा थरार उलगडण्यात जॉनची टीम यशस्वी ठरली आहे. तर, 'मिशन मंगल'देखील प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. त्यामुळे एकाच दिवशी प्रदर्शित होऊनही चित्रपटांच्या कमाईचे आकडे पाहता दोन्हीही चित्रपट हिट ठरले आहेत, असेच म्हणावे लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details