महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'गुड न्यूज'ने वर्षाचा शेवट गोड, दुसऱ्या दिवशी कमाईत इतकी वाढ - kiara advani

'गुड न्यूज' चित्रपटाने १७. ५० कोटीची दमदार ओपनिंग करुन यशाकडे वाटचाल केली होती. यामध्ये आता दुसऱ्या दिवशी यामध्ये २५ टक्के वाढ झाली आहे.

Box Office collection of Good Newwz on second day
'गुड न्यूज'ने वर्षाचा शेवट गोड, दुसऱ्या दिवशी कमाईत इतकी वाढ

By

Published : Dec 29, 2019, 4:36 PM IST

मुंबई -अभिनेता अक्षय कुमार, करिना कपूर, कियारा आडवाणी आणि दलजीत दोसांझ यांची मुख्य भूमिका असलेला 'गुड न्यूज' हा या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १७. ५० कोटीची दमदार ओपनिंग करुन चित्रपटाने यशाकडे वाटचाल केली होती. यामध्ये आता दुसऱ्या दिवशी यामध्ये २५ टक्के वाढ झाली आहे.

दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २१ कोटीची कमाई केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाची कमाई ३९.५० कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे 'गुड न्यूज' हा यावर्षाचा शेवट गोड करणारा चित्रपट म्हणता येईल. आठवड्याच्या शेवटपर्यंत हा चित्रपट ५० कोटीची कमाई करेल, असा अंदाज समीक्षकांनी वर्तवला आहे.

हेही वाचा -बॉलिवूड २०२० : नववर्षात 'हे' चित्रपट देतील बॉक्स ऑफिसवर टक्कर

अक्षय कुमारचे यावर्षी 'केसरी', 'मिशन मंगल' आणि 'हाऊसफुल ४' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पुढच्या वर्षीदेखील त्याचे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

हेही वाचा -Flashback 2019 - बॉलिवूडला मिळाले 'हे' नवे चेहरे

ABOUT THE AUTHOR

...view details