महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बाला' अन् 'उजडा चमन' मध्ये कोण मारणार बाजी, एकापाठोपाठ होणार प्रदर्शित - ayushmaan khurranna

आता 'बाला' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करुन चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

'बाला' अन् 'उजडा चमन' मध्ये कोण मारणार बाजी, एकापाठोपाठ होणार प्रदर्शित

By

Published : Oct 10, 2019, 12:42 PM IST

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुराना 'ड्रीमगर्ल' चित्रपटानंतर त्याच्या 'बाला' चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाच्या टीजरनंतर अभिनेता सनी सिंग याच्याही 'उजडा चमन' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र, हा ट्रेलर पाहुन या चित्रपटाची कथा एकाच विषयावर आधारित असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.

आता 'बाला' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करुन चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीखही जाहीर करण्यात आली आहे. आज (१० ऑक्टोंबर) या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. ७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

तर, दुसरीकडे सनी सिंगच्या 'उजडा चमन' चित्रपटाची तारीखही जाहीर झाली आहे. ८ नोव्हेंबरला 'उजडा चमन' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्हीही चित्रपटात टक्कल असणाऱ्या व्यक्तीची कथा दाखवण्यात येणार आहे. टक्कल असल्यामुळे कमी वयातच कोणकोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, याची कथा यामध्ये पाहता येणार आहे. शिवाय 'उजडा चमन' चित्रपटाच्या ट्रेलरनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत.

हेही वाचा -बहिणीची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या भावाची गोष्ट, पाहा 'खारी- बिस्कीट'चा ट्रेलर

त्यामुळे एकाच आठवड्यात दोन दिवशी एकाच आशयाचे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने आता प्रेक्षकांचा प्रतिसाद कोणत्या चित्रपटाला मिळतो, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

'उजडा चमन' चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. तर, कुमार मंगत पाठक यांनी निर्मिती केली आहे. तर, 'बाला' चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहे. तर, दिनेश विजन आणि जिओ स्टुडिओअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबत भूमी पेडणेकर आणि यामी गौतमचीही महत्वाची भूमिका असेल.

हेही वाचा -पहिल्याच चित्रपटात रेखा यांच झालं होतं लैंगिक शोषण, पैशासाठी साकारावे लागले 'बी' ग्रेड चित्रपट

ABOUT THE AUTHOR

...view details