महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ऑस्कर अकादमीचे माजी अध्यक्ष जॉन बेली यांच्या भारत भेटीवर येणार पुस्तक - ujwal nirgudkar writes book on visit of john belly in India

महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी कॅरोल लिटीलटोन हे २५ ते २८ मे या कालावधीत भारत भेटीवर होते. त्या काळात जॉन बेली ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष होते.

Book on John Belly visit to India written by ujwal nirgudkar
ऑस्कर अकादमीचे माजी अध्यक्ष जॉन बेली यांच्या भारत भेटीवर येणार पुस्तक

By

Published : Nov 30, 2019, 1:56 PM IST

मुंबई - ऑस्कर अकादमीचे माजी अध्यक्ष जॉन बेली यांच्या भारत भेटीवर आधारित पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार आहे. या अकादमीचे सदस्य उज्वल निरगुडकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पणजी (गोवा) येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवात खुद्द जॉन बेली यांनी ही घोषणा केली.

ईफ्फी महोत्सवात यावेळी जॉन बेली, कॅरोल लिटीलटोन, उज्ज्वल निरगुडकर, अनुपमा चोप्रा, महोत्सव संचालक चैतन्य प्रकाश तसेच अंकुर लाहोटी उपस्थित होते

महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी कॅरोल लिटीलटोन हे २५ ते २८ मे या कालावधीत भारत भेटीवर होते. त्या काळात जॉन बेली ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष होते. मुंबईतील चित्रपट महोत्सव सोहळ्यास ते प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले होते. त्यानंतर त्यानी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली.

हेही वाचा -अभिनेत्री उषा जाधव 'ईफ्फी'मध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीची मानकरी, बिग बींनी दिल्या शुभेच्छा

या सगळ्याचे आयोजन उज्ज्वल निरगुडकर यांच्या विशेष प्रयत्नाने झाले. त्या सर्व अनुभवावर आधारित पहिले पुस्तक मराठीत प्रकाशित होईल. त्याचे शब्दांकन चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर यांचे आहे. यानंतर हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी या भाषेतही अनुवादित होईल. इंग्रजी पुस्तक ऑस्कर अकादमी लायब्ररीत ठेवण्यात येईल हे विशेष. या पुस्तकाची घोषणा 'ईफ्फी'मध्ये करण्यात आली.

ऑस्कर अकादमीचे माजी अध्यक्ष जॉन बेली यांच्या भारत भेटीवर येणार पुस्तक

यावेळी जॉन बेली, कॅरोल लिटीलटोन, उज्ज्वल निरगुडकर, अनुपमा चोप्रा, महोत्सव संचालक चैतन्य प्रकाश तसेच अंकुर लाहोटी उपस्थित होते.

हेही वाचा -अजय देवगनसोबत 'गोलमाल'च्या टीमची पुन्हा धमाल, पुढच्या वर्षी होणार शूटिंगला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details