महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मलायका-अर्जुनच्या लग्नाबाबत बोनी कपूर यांची धक्कादायक प्रतिक्रिया - salman khan

मलायका आणि अर्जुन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्याही चर्चा सुरु होत्या. अलिकडेच दोघेही एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

मलायका-अर्जुनच्या लग्नाबाबत बोनी कपूर यांची धक्कादायक प्रतिक्रिया

By

Published : Mar 28, 2019, 7:18 PM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघेही एप्रिल महिन्यात बोहल्यावर चढणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मलायका आणि अर्जुनच्या काही खास मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीतच त्यांचा विवाहोसोहळा पार पडणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता अर्जुन कपूरचे वडिल बोनी कपूर यांनी याबाबत धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, बोनी कपूर यांनी मलायका आणि अर्जुनच्या लग्नाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बोनी कपूर याचे सलमान खानसोबत असलेल्या घनिष्ठ संबधामुळे त्यांचा या लग्नाला नकार असल्याचेही समोर आले आहे.

मलायका आणि अर्जुन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्याही चर्चा सुरु होत्या. अलिकडेच दोघेही एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. ख्रिश्चन पद्धतीने दोघे विवाह करणार असल्याच्याही माहिती समोर आली होती.

आता बोनी कपूर यांच्या स्पष्टीकरणानंतर, त्यांच्या लग्नाबाबत आणखी कोणते तथ्य समोर येते, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details