महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आशा भोसले यांना सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी, फोटो शेअर - University of Salford

आशा भोसले यांना २००० साली दादासाहेब फाळके पुरस्कार आणि २००८ साली पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

आशा भोसले यांना सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी, फोटो शेअर

By

Published : Oct 8, 2019, 8:18 AM IST


मुंबई - सिनेसृष्टीवर आपल्या आवाजाने अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आजवर त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांना इंग्लंडच्या सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी देखील मिळाली आहे. आशाताईंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

'सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी स्वीकारताना', असं कॅप्शन देऊन त्यांनी त्यांचे फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा -'हिरकणी' या सिनेमातील हिरा आणि जीवा यांच्यावरच नवीन गाणं अभिनेता विकी कौशलच्या हस्ते लाँच

संगीत क्षेत्रात आशाताई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची बरीच गाणी आजही लोकप्रिय आहेत. यामध्ये 'पर्दे मे रेहने दो', 'पिया तू अब तो आजा', 'दम मारो दम' यांसारखी विविध गाणी सुपरहिट ठरली होती.

त्यांना २००० साली दादासाहेब फाळके पुरस्कार आणि २००८ साली पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा -सारा अलीच्या आईने का लपवला चेहरा? व्हिडिओ झालाय व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details