मुंबई -बॉलिवूडमध्ये चित्रपट यशस्वी होण्यामागचं कारण 'विलन'ची भूमिका साकारणारा कलाकार असतो. विलनची भूमिका जेवढी दमदार असेल, तितकाच वाव हिरोच्याही भूमिकेला मिळतो. म्हणून आजवर अनेक कलाकार हे विलनच्या भूमिकेत पाहायला मिळाले. यामध्ये ज्यांनी बॉलिवूडमध्ये 'हिरो'ची भूमिका साकारली, अशा अभिनेत्यांनीही कधी कधी विलनची भूमिका निवडली आणि तितक्याच ताकदीने हे 'हिरो' विलनच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले.
शाहरुख खान - 'डर', बाजीगर
बॉलिवूडचा बादशाह असणाऱ्या शाहरुखने अगदी सुरुवातीच्या काळातच विलनची भूमिका निवडली होती. 'डर' चित्रपटात त्याने दमदार विलन साकारला होता. त्याची भूमिकेचं त्याकाळी प्रचंड कौतुक झालं. १९९३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सनी देओल आणि जुही चावला यांची जोडी या चित्रपटात झळकली होती. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर शाहरुखच्याच अभिनयाची जास्त प्रशंसा झाली होती.
जिमी शेरगील - 'साहेब बिबी और गँगस्टर', 'तनु वेड्स मनु'
'मोहब्बते' चित्रपटात रोमॅन्टिक भूमिका साकारणारा जिमी शेरगील पुढे 'साहेब बिबी और गँगस्टर' या चित्रपटात विलनच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर, 'तनु वेड्स मनु' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' या चित्रपटात त्याने विलनची भूमिका साकारली होती.
जॉन अब्राहम - 'धुम'
जॉनने देखील 'धुम' चित्रपटात विलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो चोराच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता.
हृतिक रोशन - 'धुम २'
हृतिक देखील बॉलिवूडचा हँडसम हिरो म्हणून ओळखला जातो. त्यानेही 'धुम २'मध्ये चोराची भूमिका साकारली होती. हा चित्रपटही सुपरडुपरहिट झाला होता.