महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'What's in your Dabba Challenge', बॉलिवूडकरांनी स्विकारलं आव्हान - akshay kumar accept Whats in your Dabba Challenge

ट्विंकल खन्नाने 'What's in your Dabba', असे आव्हान बॉलिवूड कलाकारांसमोर ठेवले होते. बऱ्याच कलाकारांनी हे आव्हान स्विकारून आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Bollywood Celebs 'Whats in your Dabba Challenge',
'Whats in your Dabba Challenge', बॉलिवूडकरांनी स्विकारलं आव्हान

By

Published : Jan 16, 2020, 4:53 PM IST

मुंबई -कलाविश्वात बरेच सेलेब्रिटी एकमेकांना काही ना काही आव्हान देत असतात. मध्यंतरी 'बॉटल कॅप चॅलेंज', 'किकी चॅलेंज' यांसारखे चॅलेंज प्रचंड गाजले. बऱ्याच कलाकारांनी हे आव्हान स्विकारून ते पूर्ण देखील केले. आता ट्विंकल खन्नानेही 'What's in your Dabba', असे आव्हान बॉलिवूड कलाकारांसमोर ठेवले होते.

बॉलिवूड कलाकारांच्या फिटनेसबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आपले आवडते कलाकार त्यांना कशाप्रकारे फिट ठेवतात, त्यांच्या आवडी निवडी, त्यांची स्टाईल, तसेच ते आहारामध्ये काय खातात, याबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायला आवडते. बऱ्याच कलाकारांनी ट्विंकल खन्नाने दिलेले हे आव्हान स्विकारून आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ट्विंकल खन्ना

काय आहे हे आव्हान?
कलाकारांनी आपल्या डब्यात ते घेत असलेल्या आहारासोबतचा फोटो शेअर करून त्याविषयी माहिती द्यावी, असे हे आव्हान होते. हे आव्हान पूर्ण करत बऱ्याच कलाकारांनी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तुषार कपूर
माही कपूर
निलम शर्मा - सोनी
मलायका अरोरा
शिखर धवन
सोनाली बेंद्रे
कॅटरिना कैफ
अक्षय कुमार

यामध्ये बॉलिवूड सेलेब्रिटीपासून, तर क्रिकेटमधील खेळाडूंनीही हे आव्हान पूर्ण केले आहे.

अक्षय कुमार, मलायका अरोरा, शिखर धवन, सोनाली बेंद्रे, माही कपूर, निलम शर्मा - सोनी, तुषार कपूर, कॅटरिना कैफ यांनी आपल्या डब्ब्यासोबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details