महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Tweet Today : इमरान हाश्मीच्या 'चेहरे' चित्रपटाची नवी रिलीझ डेट, बिग बींनी शेअर केले खास फोटो - Bollywood celebs todays twits

पाहुयात आजच्या दिवसातील कलाकारांचे काही खास ट्विट...

Tweet Today : इमरान हाश्मीच्या 'चेहरे' चित्रपटाची नवी रिलीझ डेट, बिग बींनी शेअर केले खास फोटो

By

Published : Nov 8, 2019, 11:52 PM IST

मुंबई -बॉलिवूडचे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलचे अपडेट्स शेअर करत असतात. पाहुयात आजच्या दिवसातील कलाकारांचे काही खास ट्विट...

  • १. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्या इंडियन आयडॉलमधील पुनरागमनानंतर गायिका सोना मोहापात्राने पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका केली आहे. सोनाने #MeeToo च्या चळवळीतून अनु मलिक यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले होते. त्यांच्या वादावर बऱ्याच कलाकारांनी मौन राखणंच पसंत केलं होतं. मात्र, आता सोनाला पाठिंबा देण्यासाठी अभिनेता अभय देओलने एका ट्विटच्या माध्यमातून तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.


सोनाने अभयच्या ट्विटचा एक स्क्रिनशॉट शेअर करत लिहिलेय, 'हा आपल्या इंडस्ट्रीचा पहिला अभिनेता आहे, ज्याने आपला खंबीर पाठींबा दर्शवला आहे. हा अभिनेता नेहमी आपल्या विचारानुसार चालतो. स्वत:चा रस्ता स्वत: तयार करतो. जो तो बोलतो, तेच तो करुनही दाखवतो. खूप खूप आभार. तसेच, मला सपोर्ट करण्यासाठी धन्यवाद'.

  • २. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'चेहरे' चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. नुकतीच या चित्रपटाची नवी रिलीझ डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट आता २४ एप्रिल २०२० ला प्रदर्शित होणार आहे.
  • ३. इमरान हाश्मीची भूमिका असलेला 'द बॉडी' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इमरानने या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. हा चित्रपट १३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
  • ४. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सध्या केबीसीचं सुत्रसंचालन करत आहेत. ते सोशल मीडियावरुन बरेच अपडेट्स शेअर करत असतात. त्यांनी केबीसीच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रतीक्रिया दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details