महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दुनिया के हर कोने में बैठा भारतीय आपकी बहादुरी का कायल है', अभिनंदन यांच्या वापसीसाठी बॉलिवूडकरांची प्रार्थना - Wing Commander

यह असीम, निज सीमा जाने, सागर भी तो यह पहचाने, ईस मिट्टी के पुतले मानव ने कभी न मानी हार, तूफानों की ओर घुमा दो नाविक निज पतवार।

बॉलिवूडकरांची प्रार्थना

By

Published : Feb 28, 2019, 1:42 PM IST

मुंबई - पुलवामा हल्लानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. अशातच भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडले आहेत. संपूर्ण देश अभिनंदन सुखरूप परत यावेत यासाठी प्रार्थना करत असून बॉलिवूड कलाकारांनीदेखील अभिनंदन सुखरूप परत यावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानात घूसून तेथील दहशतवादी अड्डे नष्ट केले होते. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर कमांडर अभिनंदन यांचा एक फोटो शेअर करत कवितेच्या काही ओळी लिहिल्या आहेत.


यह असीम, निज सीमा जाने,
सागर भी तो यह पहचाने
ईस मिट्टी के पुतले मानव ने कभी न मानी हार,
तूफानों की ओर घुमा दो नाविक निज पतवार।


यासोबतच दुनिया के हर कोने में बैठा भारतीय आपकी बहाद्दुरी का कायल है और आपके साथ है।जय हिंद। असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर अमिताभ बच्चन यांनीही ‘शीश झुका कर...अभिनंदन’ असे ट्विट केले आहे.

याशिवाय अभिनेत्री सुष्मिता सेन, फरहान अख्तर, हृतिक रोशन, रेणूका शहाणे आणि विकी कौशलसारख्या अनेक कलाकारांनेही कमांडर अभिनंदन लवकर भारतात परतावे यासाठी प्रार्थना केली आहे. यासोबतच पायलट अभिनंदन यांचे व्हिडिओ शेअर करणे थांबवा, असे आवाहनही या कलाकारांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details