मुंबई- वैविध्यपूर्ण भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे अदिती गोवित्रीकर. २००९ मध्ये अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
अदिती गोवित्रीकर पुन्हा झळकणार मराठी सिनेमात, 'रील' आणि 'रिअल' आयुष्य एकत्र - sanjay jadhav
अदितीने संजय जाधव यांच्या 'रिंगा रिंगा' या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. आता लवकरच ती विक्रम फडणीस यांच्या 'स्माईल प्लीज' या दुसऱ्या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
विक्रम फडणीस आणि अदिती गोवित्रीकर यांची मैत्री खूपच जुनी आहे. आपल्या या मैत्रीबद्दल आणि ही भूमिका कशी मिळाली याबद्दल अदिती सांगते, ''सुरुवातीच्या काळात विक्रम नृत्य दिग्दर्शक होता आणि त्याचे शोज मी आवर्जून पाहायचे. तेव्हापासून आमची मैत्री आहे. ज्यावेळी त्याने 'हृदयांतर' हा चित्रपट केला त्यावेळी मला मनापासून वाटायचे, की भविष्यात त्याच्या चित्रपटाचा भाग व्हावा आणि माझी ही इच्छा लवकरच पूर्ण झाली. त्याने मला त्याच्या 'स्माईल प्लीज' या चित्रपटासाठी विचारणा केली.''
मित्रासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत अदिती म्हणाली, ओळखीच्या व्यक्तीसोबत काम करणे नक्कीच सोपे असते. कारण त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी आपल्याला माहित असतात. त्यामुळे अभिनय करणे सहज शक्य होते. चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी अदिती म्हणते, या चित्रपटाचे कथानकच मुख्य हिरो आहे. कथानक अतिशय सशक्त असल्याने हा चित्रपट नक्कीच उत्कृष्ट ठरेल. या चित्रपटात मी एक महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. वैयक्तिक आयुष्यात मी डॉक्टर असून पडद्यावरही डॉक्टरची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाल्याने मी खूपच खुश आहे. असे म्हणत माझी ही भूमिका प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल, असा विश्वास अदितीने व्यक्त केला. 'स्माईल प्लीज' हा चित्रपट येत्या १९ जुलैला प्रदर्शित होत आहे.