पानिपत चित्रपटातील राजा सुरज मल यांचे चित्रण चुकीचं - वसुंधरा राजे - vasundhara raje
स्वाभिमानी निष्ठावान आणि हृदयसम्राट महाराजा सुरज मल यांना पानिपत चित्रपटामध्ये चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आले आहे, असे ट्विट वसुंधरा राजे यांनी केले आहे.

जयपूर- मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या पानिपतच्या लढाईवरील चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी टीका केली आहे. स्वाभिमानी निष्ठावान आणि हृदयसम्राट महाराजा सुरज मल यांना चित्रपटामध्ये चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आले आहे, असे ट्विट वसुंधरा राजे यांनी केले आहे.
वसुंधरा राजे यांच्य ट्विटमुळे पानिपत चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. वंसुधरा राजे यांनी ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुरज मल यांचे चुकीचे चित्रण निंदणीय असल्याचेही वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे.