महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

२६/११ च्या हल्ल्यातील हिरोची कथा येणार रूपेरी पडद्यावर; महेश बाबूची घोषणा - adivi sesh

मुंबईवरील हल्ल्यावेळी ताज पॅलेस हॉटेलमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना मेजर संदीप यांना वीरमरण आले होते.

मेजर

By

Published : Feb 27, 2019, 11:44 PM IST


मुंबई- १० वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याचा थरार आजही कायम आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना अनेकांना वीरमरण आले. यातीलच एक रिअल हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची शौर्यगाथा आता रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. मुंबईवरील हल्ल्यावेळी ताज पॅलेस हॉटेलमध्ये दहशतवाद्यांचा सामना करताना मेजर संदीप यांना वीरमरण आले होते.

यावेळी मेजर संदीप उन्नीकृष्णन हे राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये (एनएसजी) कमांडो होते. त्यांची हीच कथा या बायोपिकमधून मांडण्यात येणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती शेअर केली आहे. या चित्रपट अभिनेता अदिवी सेश मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणार आहे.

महेश बाबूची जीएमबी एंटरटेनमेंट संस्था या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट तेलुगू आणि तामिळ अशा २ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'मेजर' असं चित्रपटाचं शीर्षक असून २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details