महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हृतिकचा 'सुपर ३०' चित्रपट बिहारमध्ये होणार टॅक्स फ्री - box office

हृतिकच्या 'सुपर - ३०' चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केली आहे.

बिहारमध्ये हृतिकचा 'सुपर ३०' टॅक्स फ्री होणार

By

Published : Jul 15, 2019, 10:22 PM IST

मुंबई -हृतिक रोशनचा 'सुपर ३०' चित्रपट सुप्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. आनंद कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून उलगडण्यात आलाय. ते मुळचे बिहार येथील आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास प्रेक्षकांना टॅक्स फ्री दाखवण्याचा निर्णय बिहार सरकाराने जाहिर केला आहे. उद्यापासून म्हणजे १६ जुलैपासून सिनेमागृहात हा चित्रपट टॅक्स फ्री होणार आहे.

हृतिकच्या 'सुपर - ३०' चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details