मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांनी अयान मुखर्जीचे दिग्दर्शन असलेल्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मागच्या वर्षापासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. दरवेळी काही ना काही कारणामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबत गेली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.
अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे बरेच अपडेट्स आत्तापर्यंत शेअर केले आहेत. शूटिंग पूर्ण केल्यानंतरही त्यांनी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
हेही वाचा -बिग बीने 'ब्रम्हास्त्र'च्या सहकलाकारांसोबचा फोटो शेअर करीत केले कौतुक