मुंबई - बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत त्या फ्रॉकमध्ये दिसत आहेत.
लता मंगेशकर यांनी आज ट्विट करीत त्यांचे अध्यात्मिक गुरू पंडित जम्मू महाराज आणि दिवंगत कवी नरेंद्र शर्मा यांच्या पुण्यततिथी निमित्त श्रध्दांजली वाहिली.
लता मंगेशकरांच्या या ट्विटला उत्तर म्हणून या दिग्गज बहिणींचे फोटो अमिताभ बच्चन यांनी शेअर केले.
फोटोच्या कॅप्शनमध्ये बच्चन यांनी लिहिलंय, ''लताजी आणि आशाजींचे बालपणीचे फोटो. आज आशाजी यांनी आपल्या गुरूचे स्मरण कसे केले हे ट्विटरवर वाचले आणि अचानक हे फोटो हाती लागले. टॅलिपॅथी.''
यांच्या ट्विटनंतर अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत. आशाजी आणि लताजी आपल्या प्रेरणास्थान असल्याचे काहींनी म्हटलंय, तर फोटो बद्दल बच्चन यांचे अनेकांनी आभार मानले आहेत.