महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मनालीच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये महानायकाचं 'ब्रम्हास्त्र' शूट - Amitabh bachchan latest news

'ब्रम्हास्त्र'च्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांचा एकदम कुल लूक पाहायला मिळतो.

Big B shoots in freezing temperature in Manali for Brahmastra
मनालीच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये महानायकाचं 'ब्रम्हास्त्र' शूट

By

Published : Dec 3, 2019, 11:42 AM IST

Updated : Dec 3, 2019, 11:56 AM IST

मनाली -बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या मनाली येथे गोठवणाऱ्या थंडीमध्ये आगामी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी रवाना झाले आहेत. 'ब्रम्हास्त्र'च्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांचा एकदम कुल लूक पाहायला मिळतो.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे देखील सेटवर उपस्थित होते. 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात त्यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. मनालीच्या बिलासपूर सर्किट हाऊस येथे चित्रपटाची टीम थांबली आहे. येथील कर्मचाऱ्यांनी सर्वांचे जोरदार स्वागत केले.

हेही वाचा -अभिनेत्री उषा जाधव 'ईफ्फी'मध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीची मानकरी, बिग बींनी दिल्या शुभेच्छा


यापूर्वी हा चित्रपट या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु व्हीएफएक्स आणि काही तांत्रिक बाबींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

'ब्रम्हास्त्र'चे चित्रीकरण बल्गेरिया, न्यूयॉर्क आणि मुंबईमध्येही करण्यात आले आहे. आहे. या चित्रपटात मौनी रॉय आणि टॉलीवूड अभिनेता नागार्जुनही आहेत. 'ब्रम्हास्त्र'शिवाय बिग बी आगामी 'चेहेरे', 'गुलाबो सीताबो' आणि 'झुंड' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा -...अन् विमानतळावरच दीपिकाने कार्तिकसोबत गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हिडिओ

Last Updated : Dec 3, 2019, 11:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details